नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Aai vadil status Marathi, आई वडील स्टेटस मराठी, Aai status marathi, आई स्टेटस मराठी, Aai baba status Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत. इथे तुम्हाला जो आई बाबा स्टेटस मराठी आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता
तुमच्या जवळ आणखी Aai baba Marathi status Whatsapp, आई बाबा स्टेटस व्हाट्सएपसाठी, Aai quotes marathi, आईसाठी मराठी कोट्स असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर मित्रांनो आज https://packersmoversinmumbai.com/ आपल्या साठी आई बाबा सुविचार घेऊन आला आहे. तर चला Aai baba Suvichar Marathi सुरवात करू या
Table of Contents
Aai vadil status Marathi | आई वडील स्टेटस मराठी
20 रुपये वाचावे म्हणुन
20 मिनिट चालत जाणारे वडिल असतात
आणि विस मिनिट वाचावे म्हणुन
20 रुपये खर्च करणारा मुलगा
बापाला कधी विचारु नका
आमच्यासाठी तुम्ही काय केलय
यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा
आपण भरारी मारत असू,
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून
पहात असतील,
ते दोन डोळे म्हणजे आपले
आई-वडील
आपली आई म्हणजे
मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे
अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे
भजनात गुणगुणणारी अशी संतवाणी
आणि आई म्हणजे
वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी
लयबध्द टाळी
आणी वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
जिथे माझ्या आईबाबांना इज्जत नाही
तिथे मी वाकून सुद्धा बघत नाही
नमस्कार न करता ही
आपल्याला आशीर्वाद देणारी
जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे
आपली आई
मातृवाच्या उद्रात
नवीन पावलांच्या आगमनानं
ममतेला जो आनंद मिलतो
तो फक्त आणि फक्त
एक आईच समजु शकते
लहानपणी आपण आई माझ्याकडे ये
म्हणून भांडत होतो
आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहू देत
म्हणून भावंडाबरोबर भांडत आहोत
माझ्या प्रत्येक वेदनेवरचं
औषध आहेस तु,
माझ्या प्रत्येक सुखाचं
कारण आहेस तु,
काय सांगु कोण आहेस तु,
फक्त हा देह माझा आहे
त्यातील जीव आहेस तु
आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात नेहमी
पाठीशी असावा
जेव्हा घरात भाकरीचे
चार तुकडे असतात
अन खाणारे पाच असतात
तेव्हा एक जण म्हणते
मला भुख नाही
ती म्हणजे
आई
सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहीशी करते आई
आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे
आपल्यामुळे आई-वडीलांच्या चेहऱ्यावर असणारा
आनंद आणि समाधान
Aai vadil status Marathi
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं.
प्रमात हारलात म्हणून
आयुष्य सपवण्यात काहीच अर्थ नाही
कारण तिला/त्याला कदाचित
दूसरा साथीदार मिळेल
पण तुमच्या आई-बाबा ला
तुमच्यासारखा मुलगा/ मुलगी
कधीच नाही मिळणार
Aai status in marathi
आई एकमेव अशी व्यक्ति आहे जी
कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला
दुःखी ठेवणार नाही
अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात
पण ते अनुभवायला
आज वेळ नाही,
आईच्या अंगाईची जाणीव आहे
पण आईला आज आई म्हणायलाच
वेळ नाही
सगळी नातीसंपवून झाली
पण त्या नात्यांना विचारायलाही
आज वेळ नाही..
सगळयांची नावं मोबाईल मध्ये save आहेत
पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही
आज वेळ नाही
Aai status marathi | आई स्टेटस मराठी
जिथे आई हसते
तिथ साक्षात देव असतो
पुर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिल नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
आईच्या पदरात झोपण्याचा आनंद
पुढची पिढी घेऊ शकत नाही
कारण जिन्स घातलेली आई
पदर देऊ शकत नाही
आई-बाबा ही जगातील एवढी मोठी हस्ती आहे
ज्याच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही
आई ही अशी बँक आहे जिथे आपण
आपली प्रत्येक भावना आणि दुःख
जमा करू शकतो
स्वर्गात पण जे सुख नाही ना
ते आई तुझ्या चरणाशी आहे..
कितीही मोठी समस्या असुदेत
फक्त आई या नावातच समाधान आहे
आयुष्यात तुम्ही सर्व गोष्टीना सोडा
पण कधी कोणासाठी स्वतःच्या
आई बाबा ना कधीच सोडू नका
सर्वाना सुट्टी असते
पण आईला कधीच सुट्टी नसते…
आई ची वेडी माया
पडतो मी तुझ्या पाया
कायम तुझ्या पोटी जन्मो
हीच माझी जन्मोजन्मी ची आशा
देवाची पूजा करून
आई मिळवता येत नाही
आईची पुजा करून मात्र
देव नक्कीच मिळवता येतो..
स्वतःला विसरून
कुटुंबासाठी जगणारी
आयुष्यभराची साथ असते आई
Aai status marathi
तुम्ही आईच अस्तित्व नकारु शकत नाही
जेव्हा जेव्हा तुम्हाला वेदना होते
तेव्हा तुमच्या तोंडातुन पहिला शब्द
आई हाच निघतो
तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती
अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही
गरीबच आहात
जगामधे सर्व काही मिळेल
पण आई-वडील नाही मिळणार
हे केव्हाच विसरु नका
आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी
आई-वडिलांना सोडू नका
या नवीन वर्षात असा संकल्प करा की
आपल्यामुळे आई वडिलांना त्रास होईल
अस कधीच वागणार नाही
आई बाबा तुमच्या शिवाय
जगण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत मी
पैशाने सर्व काही मिळेल पण
आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली
कुठेच नाही मिळणार
आई च्या आठवणींपासून दूर जाण
कधीच जमणार नाही…
आणि तिने दिलेले हे हृदय रुपी फुल
सुकले तरी त्याचा सुगंध कधीच सुकणार नाही.
आईचा आशीर्वाद आणि बाबांच्या शिव्या
या मध्ये जगण्यात काही वेगळीच मज्जा आहे
आई वडिलांची स्वप्न पुर्ण करताना
कामाची लाज बाळगु नका
आणि कष्टाला घाबरू नका.
आई बाबा
या जगाधील कोणतही चॉकलेट
तुमच्यापेक्षा गोड नाही.
मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर
सगळेच बोंबलून रडतात
खरा पोरगा तोच
जो जिवंतपणी आईबापाची सेवा करतो
पूर्ण जग जिंकून सुद्धा
जर आई-वडिलांच हृदय
नाही जिंकु शकलात
तर ते जिंकणे हरण्यासमान आहे
आई वडीलांचा आशिर्वाद हा
न दिसणारा असा एक हात असतो
जो तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत असतो
आई बाबांच्या रुपात साक्षात
देव माझ्या सोबत आहेत
जगातील सर्वात सुंदर गोष्ट
आणि ती म्हणजे
आपल्या आई बाबांच्या चेहऱ्यावर
एक सुखद हास्य
आणि त्याच कारण आपण स्वतः असणं
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो
तो एक बाप असतो.
Aai baba status Marathi | आई बाबा स्टेटस मराठी
आई
ही जगातली इतकी मोठी व्यक्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा
कोणत्याही जन्मी करु शकत नाही
आई हि एकमेव अशी व्यक्ति आहे जी
इतरांपेक्षा नऊ महीने जास्त तुम्हाला
ओळखत असते
खूप अडचणी आहेत आयुष्यात
पण सामोरे जाण्याची शक्ती फक्त
आई तुझ्यामुळे येते
आई घरात फक्त बसून असेल ना
तरी ३३ कोटी देवांचे अस्तित्व
घराला लाभते आणि घराला
घरपण येते
कदाचित ती आईच होती
अबोलं होउन पाहत होती
लेकरासाठी तुटत होती
आणि कुंकवासाठी झटत होती.
आई आणि बाबा ही जगातील
इतकी मोठी हस्ती आहे
ज्यांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा
परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी
करू शकत नाही
आई बाप् जिवंत असता
नाही केलीस तू सेवा
मग मेल्यावरती कशाला म्हणतोस
देवा देवा,
बुंदी लाडूच्या पंगती बसवशी
नंतर तू जेवाया,
काया जिझवूनी तूझ्या शिरावर ठेविली
सुखाची छाया,
अरे वेड्या मिळणार नाही पुन्हा
आई बापाची माया
Aai baba status Marathi
वयाने साथ सोडली म्हणुन काय झाले
आई बाबा मी कायम तुमच्या सोबत आहे
बाप जीवंत असे पर्यंत
परिस्तिथीचे काटे
कधीच आपल्या पर्यंत
पोहचु देत नाही
घरात आल्या आल्या तुझ्याकडे माझ
काहीच काम नसत
पण आई तुला पाहिलं की
मनाला खुप शांतता मिळते
स्वतःसाठी तर सगळेच जगतात
जमलच तर आई वडिलांसाठी
पण जगुन पहा
आई-बाबां साठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टी साठी
आई-बाबांना सोडु नका
आई-बाबांच प्रेम समुद्रासारख.असत
तुम्ही त्याची सुरुवात पाहु शकता
पण शेवट नाही
ओझ आणि मन
आई वडिलांजवळ हलक करा
कारण ते तिथेच सुरक्षित राहु शकत
मरणयातना सहन करून सुद्धा
आपली जीवनयात्रा सुरु करून जी देते
ती आपली आई असते.
संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा फक्त आईबाबाच सोबत असतील
Aai baba Marathi status Whatsapp | आई बाबा स्टेटस व्हाट्सएपसाठी
आई कोणीच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज कुशित घेऊन झोपणार
नसेल नवऱ्याची राणी कदाचित
पण प्रत्येक मुलगी ही
तिच्या वडिलांसाठी परीच असते
एक Rose त्यांना पण द्या
जे दररोज आपल भविष्य घडविण्यासाठी
संघर्ष करत आहेत
बापाला कधी म्हणु नका
आमच्यासाठी तुम्ही काय केलय
पैसे कमवायला बाहेर जाल तेव्हा समजेल
बापानी आपल्यासाठी काय केलय
आई मला तुझ्या कुशीत
पुन्हा यावेसे वाटते,
या जगापासून मला आता
खूप दूर जावेसे वाटते.
या जगामधे आई सारखा टिकाकार
कोणीच नाही
chocolate मध्ये
विशेष अस काही नाही,
त्या पेक्षा ही गोड Gift’s
देवाने मला दिलेले आहेत आई बाबा
Aai baba Marathi status Whatsapp
माझ्या प्रत्येक वेदनेवर
औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे
कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू
फक्त हा देह माझा आहे
पण त्या मधील प्राण आहेस तू
वडिलांच प्रेम म्हणजे
पाया कधी दिसत नाही
पण त्या शिवाय इमारत ऊभी राहु शकत नाही
खरा आनंद तर तेव्हा होईल
जेव्हा पैसे माझे असतील
आणि खरेदी माझे आईबाबा करतील
जिद्द ठेवा
जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न
पुर्ण होणार नाहीत
तो पर्यंत गप्प बसणार नाही.
आयुष्यात कायम दोन व्यक्तींची
काळजी घ्या
पहिली म्हणजे तुमच्या हरण्याला
जिंकणं मनात आलेली तुमची आई
आणि दुसरी म्हणजे
तुम्ही जिंकण्यासाठी आयुष्यभर
हरत आलेले तुमचे लाडके बाबा
बाप स्वतः ची स्वप्न विसरतो
तो मुलांसाठी झिजतो
ते फक्त मुलांच्या भविष्यासाठी
आई स्वतः उपाशी राहील
पण मुलांना कधीच
उपाशी राहु देत नाही.
आई तू उन्हामधली एक सुखद सावली
आई तू मुसळधार पावसामधली छत्री
आई तू हिवाळ्याच्या थंडी मधली शाल
आता येऊदे मला दुःखे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा कळस
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस
Aai quotes marathi | आईसाठी मराठी कोट्स
खुप दु:ख आहेत आयुष्यात
पण आईकडे पाहिल ना कि
सर्व दुःख विसरून जातो
आपल्या आयुष्याची स्वप्ने पाहताना
विस्तवाला कधी विसरायचं नसत….
गुलाबाला स्पर्श करताना
काट्यांच भान नेहमी ठेवायच असत..
जीवन हे शून्यातूनच उभं करायचं असत
आई वडिलांचे ऋण फिटल्याशिवाय
मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसत
आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवु शकत
काही हरकत नाही
पण आई वडिलांना तरी खुश ठेवण्याचा
प्रयत्न करा
मरणयातना सहन करून
आपली जिवन यात्रा सुरु करुन देते
ती आई असतें
आई वडिलांचा हात धरून चाललोय
म्हणून तर आज पर्यंत कोणाचे
पाय धरायची वेळ आली नाही
स्वार्थी लोकांसाठी
निस्वार्थी आई वडिलांकडे
दुर्लक्ष तर होत नाही आहे ना
किंमत नेहमी त्यांचीच करा
जे तुमच्या आई बाबांची इज्जत करतात
बापाचा कधी राग मानुन घेवु नका
कारण आई चुक पदरात घेते
पण बाप चुक सुधारायला लावत असतो
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे
असेच कायम राहूदे…!!!
आणि असेच माझ्या ह्या जीवनाला
अर्थ येऊ दे
Aai quotes marathi
पैशाने सर्व काही विकत मिळेल पण
आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही
मला जगाच काही घेण-देण नाही
मी आई वडिलांच्या नजरेत
अजुन ही चांगला आहे
देवाच्या शोधामध्ये धावतेय दुनिया सगळी
पण सांगा आई आहे का देवा वेगळी
पैसा पुन्हा पुन्हा कमवता येईल
पण आई वडिलांसारखी संपत्ती
पुन्हा पुन्हा मिळणार नाही
ह्या जगात असे एक न्यायालय आहे
की जिथे सर्व गुन्हे होतात आणि ते म्हणजे
आई.
आई बाबा सुविचार | Aai baba Suvichar Marathi
जर का पुन्हा जन्म असेल तर
मला प्रत्येक जन्मात
आई बाबा म्हणुन तुम्हीच पाहिजे
आई आणि बाबा
म्हणजे मंद तेवणारी समई
जणू ती आपली लाडकी आई,
जीवन आपले प्रकाशमान करून जाई
पण त्या ज्योतीचा चटका सहन जो करतो,
तोच खरा आधार ज्याला आपण बाप म्हणतो
सोबत कोणी असो या नसो
आई वडिलांचे आशीर्वाद
नेहमी सोबत असतात
आयुष्य खुप सुंदर आहे
आणि ते फक्त आई वडिलांसाठीच जगायच.
माझ ध्येय तेव्हा पुर्ण होणार
जेव्हा आई वडिलांना माझ्यावर
गर्व वाटेल
असेल जर मजला यापुढे
मानव जन्म कधी
तर आई फक्त तुझ्याच पोटी
मला पुन्हा जन्मावेसे वाटते
जास्त काहीच नकोय मला
फक्त संपुर्ण आयुष्य
तुझ्या सोबत जगायच आहे मला आई
Valentine Day त्यांच्या सोबत साजरा करा
ज्यांच्या कडे पाहुन समजत
खर प्रेम काय असत.
आई गरीब असो या श्रीमंत
पण स्वतःच्या मुलांना
कधीच काही कमी पडु देत नाही
आयुष्यामध्ये बरीच माणस भेटतात
पण प्रत्येक वेळी आपल्याला समजुन घेतील
असे फक्त आई वडीलच असतात
आई म्हणजे जी एकमेव स्त्री
जी माझा चेहरा बघायचा आधीपासून
माझ्यावर खरं प्रेम करते….
आणि माझे बाबा
जो एकमेव माणूस जो
माझ्यावर स्वतःपेक्षा ही जास्त
प्रेम करतो
आयुष्यात सर्व काही विसरा
पण स्वत:च्या बापाला कधीच विसरू नका
जर तुम्हाला
आई बाबांचा फोन येत असेल
तर तुम्ही खुप भाग्यवान आहात
मला देवाने दिलेलं
सर्वांत मोठं गिफ्ट म्हणजे
माझी आई
आपला बाप पैशाने छोटा असेल
पण मनाने खुप मोठा असतो
बापाच्या गरीबीवर कधीच लाजु नका
पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही
आईच्या डोळ्यांत येणाऱ्या
आनंदाश्रूसाठी मोठ होयचयं
जो आधी रडतो ना पण नंतर
तेवढंच प्रेमाने समजून सांगतो
तो आपला बाबा असतो…
आणि जी रडवून स्वतः सुद्धा रडते ना
ती आपली आई असते..
ज्योतिषाकडे जाउन
कुंडली दाखवु नकोस
यशस्वी व्हायचं असेल तर
आई वडिलांनी केलल कष्ट विसरु नकोस
aai baba quotes in marathi
🙏👉 मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हे Aai vadil status Marathi, आई वडील स्टेटस मराठी आवडले असतील. जर का तुम्हाला हे Aai status marathi, आई स्टेटस मराठी आवडले असतील तर खाली दिलेल्या Facebook आणि Whatsapp बटणांचा वापर करून तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.
🙏👉 आशा करतो की आम्ही या पोस्ट मध्ये शेअर केलेले Aai quotes marathi, आईसाठी मराठी कोट्स तुम्हाला आवडले असतील. तुम्हाला हा Aai baba status Marathi चा संग्रह कसा वाटला ते आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
🙏👉 जर का तुमच्या कडे काही इतर Aai baba Suvichar Marathi मध्ये असतील तर आमच्या अधिकारीक ई-मेल packersmoversinmumbai1@gmail.com वर किंव्हा खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आम्ही तुमचे मराठी आई बाबा सुविचार आमच्या वेबसाईट च्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.
Leave a Reply